Khopa Bird House

KHOPA BIRDS HOUSE

एक घर पक्षांसाठी

एक काळ होता चिमण्या पाखरांच्या किलबिलाटाने पहाटे जाग यायची. एक घास चीऊचा, एक घास काऊचा असे म्हणत आई बाळाला घास भरवायची पायऱ्यावर बसून तांदूळ निवडता निवडता भातकोट्या बरोबर चार दोन दाणे तांदूळ अंगणात टाकले जायचे आणि चिउंचा , थवा त्यावर ताव मारायचा. अंगणात वाळवण होती एकंदर काय चिमण्या पाखरांची उदार्निवाहाची सोय होती. कौलारू घरे होती, घरात कोनाडे असायची त्यांच्या वळचणीला पाखरे घरटे करायची. एकंदर माणसांवर ज्या पक्ष्यांच जीवन चक्र चक्र होत ते अगदी सुरळीत चालू होत.

एक मस्त सह जीवन चालू होत. मग हळू हळू आपन बदलत गेलो. कौलारू घरे गेली आर. सी. सी. पक्की घरे झाली, माणसे आपापल्या घरात बंदिस्त झाली, मातीची अंगणे गेली, डांबरी रस्ते फुटपाथ बिल्डिंग शहर चकाचक झाली निसर्गावर मात करत करत आपन खुपच पुढे गेलो आणी मग आज आपल्याला आता कळतय कि आपल्या बरोबरची चिऊताई ती कुठे गेली ?

आपण विसरुनच गेलो तिला.

आपण पुढच्या पिढीला चित्रातील चिमणी कावळे दाखवून ही बग चिऊ -काऊ म्हणायची वेळ आली आहे. चिमण्या पाखरांशिवाय हे सगळ किती भकास दिसतंय, नाही-नाही असे कसे वागलो आपण ?

आता विचार करुया आपल बालपण ज्या चिऊ-काऊच्या संगतीत गेले ते आपण पुढील पिढीस देण्यास एक पाऊल उचलुया. आपल्या घराच्या बाल्कनीत चिमण्यांणसाठी एक घरटे लाऊया त्या साठी आपण एकच करायचे आहे.

तुम्ही फक्त एक सुंदर आणी आकर्षक घरटे जे आम्ही तयार करतो ते खरेदी करून आपल्या घराभोवती अडकवायचे बघा काही दिवसांतच तुमच्या घराभोवती चिमण्यांचा चिवचिवाट सुरु होईल नुसत्या चिमण्याच नाही तर अनेक छोटे छोटे पक्षी तुम्ही लावलेल्या घराला आपले हक्काचे घर समजतील आपल्या पिलांच्या सुरक्षिततेची त्यांची काळजी संपून जाईल आणी आपल्या घराची शोभाही वाढेल

त्या योगे या पक्षांच्या संखेत वाढ होईल चला तर आजच एक निश्चय करुया

माझा घर झालं आता एक घर चिऊताईसाठी बांधायचच !...